News

‘एका विचारवंताची गोष्ट’ नरहर कुरुंदकरांच्या जीवन-विचाराचे दर्शन अभिवाचन नाट्यप्रयोग

October 20, 2026 18:15:38 IST
MTG editorial


सुप्रसिद्ध विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे “नरहर कुरुंदकर – एका विचारवंताची गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण आहे.

अभिवाचनाचा हा अभिनव प्रयोग मुंबईत शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी एनसीपीए येथे आणि शनिवार दि. 31 ऑक्टोबर रोजी प्रायोगिक रंगमंच, यशवंत नाट्य मंदिर होत आहेत. दोन्ही प्रयोग सायंकाळी 7 वा. असतील.

राज्य शासनाचे निवृत्त सांस्कृतिक कार्य आणि माहिती संचालक लेखक, दिग्दर्शक अजय अंबेकर आणि सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, मुलाखतकार आणि दूरदर्शन सह्याद्रीच्या वृत्तनिवेदक ज्योती अंबेकर हा प्रयोग सादर करतात.

नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मुलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. पुरोगामी विचाराच्या मांडणीबरोबरच अनेक साहित्यिक, सांस्कृतिक संस्था उभारणीला त्यांनी मोठे पाठबळ दिले होते. विद्यार्थी घडविणे आणि मराठवाड्यातल्या व्यक्ती आणि संस्था यांना प्रोत्साहन देण्याची मोठी कामगिरी त्यांनी त्यावेळी केली.

या सर्व पैलूंची अत्यंत रंजक मांडणी या प्रयोगात करण्यात आली आहे. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. विनामध्यंतर सलग दीड तास अवधीचा हा प्रयोग आहे. हा प्रयोग म्हणजे सकस आणि अर्थपूर्ण कलाकृतीची आस असणार्‍या तसंच नवीन काही शोधू पाहणार्‍या रसिकांसाठी पर्वणी आहे. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे आहे.

यापूर्वी आठ कलावंतांनी या नाटकाचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह बेळगाव आणि हैदराबाद येथे तीस प्रयोग सादर केले आहेत. या प्रयोगांना मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्रयोग सहजपणे पोहचता यावा, याकरिता दोन पात्रांच्या सहभागाच्या दृष्टीने संहिता संपादित करण्यात आली आहे. नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितही किती उपायुक्त आहेत हे या प्रयोगाने मांडले आहे.

एनसीपीएच्या प्रयोगाची तिकिटे

यशवंत नाट्य मंदिरातील प्रयोगाची तिकिटे ऑनलाईन उपलब्ध आहेत.


*Mumbai Theatre Guide takes no responsibility for change in schedule.


read / post your comments

   More on Theatre Update
- ‘एका विचारवंताची गोष्ट’ नरहर कुरुंदकरांच्या जीवन-विचाराचे दर्शन à¤...भिवाचन नाट्यप्रयोग (new)
- This Week in Mumbai Theatre: Bold Stories and Brilliant Performances
- From Laughter to Drama: Mumbai Theatre's Exciting Week Ahead
- Nana Patekar Passes Away at 75: Remembering the Legendary Bollywood Actor
- SHIV SHAKTI - Ek Divya Pranay Katha to Be Staged in Mumbai on October 24 & 25
- What's Playing in Mumbai: Theatre Shows This Week
- Vivechana's 32nd National Theatre Festival 2026 Begins October 23 in Jabalpur
- Ranga Shankara Theatre Festival 2026 Announces Six-Play Lineup
- Step Into the Spotlight: Mumbai Theatre Shows This Week
- Three Days of Dastangoi in Delhi: Storytelling Festival at India
- On Stage This Week: Discover Mumbai's Exciting Theatre Line-Up
- Ekjute Celebrates 45 Years of Theatre with Special Festival at Prithvi Theatre
- 45 साल के रंगमंचीय सफर का जश्न मनाएगा एकजुट थिएटर फेस्टिवल
- Your Guide to Mumbai Theatre: Upcoming Plays, Performances and Must-Watch Shows
- Ank's 50th Year Production - VEERA RANI ABBAKKA
   Theatre Update Archives




   Discussion Board


Schedule


Theatre Workshops
Register a workshop | View all workshops

Subscribe


About Us | Feedback | Contact Us | Write to us | Careers | Free Updates via SMS
List Your Play